चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३० वर आगडी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्मिळ नर चांदी अस्वलाचा मृत्यू झाला आहे. या महामार्गावर आतापर्यंत चार चांदी अस्वलांचा अपघातात बळी गेला असून, वन्यजीवांसाठीच्या उपशमन योजना अद्यापही प्रत्यक्षात न आल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कावल–ताडोबा–उमरेड वन्यजीव भ्रमणमार्गावरील वाढत्या अपघातांमुळे तातडीने संरक्षणात्मक उपाययोजना राबविण्याची मागणी हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीने केली आहे.
