चंद्रपूर जिल्ह्यात अवैध रेती उत्खनन करतांना काँग्रेसच्या बड्या नेत्याचे ३ हायवा आणि १ पोकलेन जप्त करण्यात आले आहेत. मूल महसूल विभागाने उमा नदीच्या राजोली घाटावर ही कारवाई केली. महसूल विभागाच्या कारवाईत जवळपास २ कोटींच्या वरील मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. जप्त करण्यात आलेले हायवा काँग्रेसचे माजी चंद्रपूर तालुकाध्यक्ष शामकांत थेरे यांच्या मालकीचे असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.
मूल तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने धडक कारवाई करत तीन हायवा आणि एक पोकलेन मशीन जप्त केली. कारवाईनंतर सर्व वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली असून त्यांच्यावर महसूल नियमांनुसार पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
