16 नगरसेवकांनी वडेट्टीवार समर्थक असलेले काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांना पदावर हटवण्यासाठी पत्रावर केली सही, उद्या नागपूर विभागीय आयुक्तांना देणार पत्र

चंद्रपूर महानगरपालिकेतील खासदार प्रतिभा धानोरकर समर्थक असलेल्या 16 नगरसेवकांनी वडेट्टीवार समर्थक असलेले काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांना पदावर हटवण्यासाठी पत्रावर सही केली असून उद्या नागपूर विभागीय आयुक्तांना राजेश अडुर यांना गटनेते पदावरून हटवण्याबाबत 16 नगरसेवकांच्या सहीचं हे पत्र दिलं जाणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या 16 नगरसेवकांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत वडेट्टीवार समर्थक असलेले काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर या 16 नगरसेवकांनी सही केली. तर दुसरीकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या नगरसेवकांच्या बैठकीला कुठल्याही नगरसेवकांनी उपस्थित राहू नये आणि कुठल्याही प्रस्तावावर सही करू नये यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेतील गटनेते राजेश अडूर यांनी व्हीप काढलाय. या बैठकीस उपस्थित राहिल्यास कारवाई करण्याचा देखील इशारा देण्यात आला आहे. धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलवण्यात आलेली बैठक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचं राजेश अडुर यांनी काढलेल्या व्हीपमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *