चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा आणि तंबाखू विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. वडगाव परिसरातील एका घरावर आणि पानठेल्यावर छापा टाकत पोलिसांनी तब्बल ५ लाख ४८ हजार ९९२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखू आणि सिगारेटचा साठा जप्त केला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे.
