अल्ट्रा मॅन ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत डॉक्टर प्राजक्ता अस्वार चंद्रपूर यांचे नेत्रदीपक यश

दिनांक 9 10 आणि 11 मे रोजी ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या अल्ट्रा मॅन ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत डॉक्टर प्राजक्ता यांनी सहभाग घेतला होता.
ही स्पर्धा जगातील अतिशय कठीण अशी स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेत जगभरातील एकूण 39 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत पहिल्या दिवशी दहा किलोमीटर जलतरण आणि 145 किलोमीटर सायकलिंग करायचे होते .

दुसऱ्या दिवशी 172 किलोमीटर सायकलिंग व तिसऱ्या दिवशी 84.3 किलोमीटर धावणे असे या स्पर्धेचे स्वरूप होते.
या स्पर्धेसाठी भारतातून एकूण आठ स्पर्धक सहभागी झाले. त्यापैकी चंद्रपुरातील स्त्री रोग तज्ञ डॉक्टर प्राजक्ता अस्वार या एकमेव स्त्री स्पर्धक होत्या.
संपूर्ण भारतातील त्या पहिल्याच डॉक्टर स्त्री स्पर्धक आहेत ज्यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. अतिशय कठीण अशी स्पर्धा शिस्त,अहोरात्र मेहनत, जिद्द, आणि खेळावरचे त्यांचे प्रेम या सर्व गोष्टींमुळे त्या पूर्ण करू शकल्या.
यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या देशातील आयरन मॅन जर्मनी , फिनलड, बसलटn, इस्टोनिया गोवा पूर्ण केलेले आहेत. त्या दरवेळी स्वतःसाठी एक नवीन उद्दिष्ट तयार करतात आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून देतात. त्यांच्या या स्पर्धेतील यशाबद्दल आयएमए चंद्रपूर अध्यक्ष डॉ. प्रसाद पोटदुखे, सचिव डॉ. ऋजुता मुंधडा तर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या वेळेस सर्व भारतीय मुलींनी व स्त्रियांनी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये हिरीरीने भाग घ्यावा व स्वतःचे परिवाराचे व भारत देशाचे नाव मोठे करावे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांच्या या यशामुळे भारत देशाचे नाव मोठे झालेले आहे. त्या सर्व भारतीय मुलींसाठी व स्त्रियांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनले आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *