निमा चंद्रपूर शाखेद्वारा आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) या डाॅक्टरांच्या संघटनेच्या चंद्रपूर शाखेद्वारा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या उपलक्षाने विविध क्षेत्रातील कष्टकरी महिलांचा सन्मान पुष्पगुच्छ व मिठाई वाटप करून करण्यात आला.

यावेळी निमा चंद्रपूर शाखेतील डॉक्टरांनी चंद्रपूर शहरात फेरफटका मारून कर्तव्यावर असलेल्या राज्य परिवहन विभागातील महिला वाहक व कर्मचारी, रामनगर पोलीस स्टेशन येथील महिला कर्मचारी, शासकीय रुग्णालयातील परिचारिका,सफाई कामगार, घंटागाडी वर कार्यरत महिला, पेट्रोल पंप वर कार्यरत महिला, तसेच विविध छोटे व्यवसाय करणाऱ्या कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला. अनपेक्षितपणे झालेल्या या सन्मानाने सर्व महिलांनी निमा चंद्रपूर शाखेचे आभार व्यक्त केले.

याप्रसंगी निमा चंद्रपूर शाखेचे अध्यक्ष डॉ दिपक भट्टाचार्य, कोषाध्यक्ष डॉ नितीन विश्वास, उपाध्यक्ष डॉ विजय भंडारी, ज्येष्ठ सदस्य डॉ भुपेंद्र लोढीया, डॉ प्रदीप मोहुर्ले, डॉ अमित कोसुरकर, डॉ गोपाल सरबेरे, डॉ शिल दुधे,डॉ मंगेश भरडकर, डॉ सचिन कोल्हे, डॉ रोहित निखाडे, डॉ मनीष मोते,डॉ श्रीकांत अकोटकर यांची उपस्थिती होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *