काँग्रेसने आज प्रचारात सर्व शक्ती पणाला लावत आज प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांनाही प्रचारात उतरवले. गौतमी पाटील यांचा आज बाबूपेठ ते गांधी चौक असा पाच किलोमीटरचा रोड शो त्यांनी केला. मतदारांना अभिवादन करीत त्यांनी काँग्रेससाठी मते मागितली.
आज चंद्रपूर शहरातील सर्व दिशांनी रॅली काढून काँग्रेसने आज प्रचारात रंग भरला. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांनी आजपर्यंत स्वतंत्र सभा घेतल्या. मात्र आज हे दोघेही एकत्र सभा घेत असून, गौतमी पाटील यांना उतरवून प्रचारात ग्लॅमर ओतण्याचे कामही काँग्रेसने केले. चंद्रपुरात येऊन मला छान वाटले. लोकांचे भरभरून प्रेम मिळाले, अशा भावना गौतमी पाटील यांनी व्यक्त केल्या.
