अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या काँग्रेस नेत्यांचा भाजप प्रवेश

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दुपट्टा टाकून माजी आमदार अविनाश वारजूरकर, माजी जि. प. अध्यक्ष सतीश वारजूरकर आणि शंकरपूरचे सरपंच साईश वारजूरकर यांना पक्षात दिला प्रवेश, चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणातील मोठी घडामोड

अखेर चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या 3 काँग्रेस नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात दुपट्टा टाकून माजी आमदार अविनाश वारजूरकर, माजी जि. प. अध्यक्ष सतीश वारजूरकर आणि शंकरपूरचे सरपंच साईश वारजूरकर यांना पक्षात प्रवेश दिला. या नेत्यांनी काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तेव्हाच या राजकीय भूकंपाची चाहूल लागली होती.

वारजूरकर बंधूंनी लिहिलेले राजीनामा पत्रात गटबाजीला कंटाळून आपण हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले आहे. याशिवाय काही नेते आपला धंदा वाढविण्यासाठी पक्षाचा वापर करत असल्याची टीका केली होती. भाजप प्रवेश करणारे सर्व नेते चिमूर विधानसभा मतदारसंघातील महत्वाचे काँग्रेस नेते होते. यातील डॉ. अविनाश आणि सतीश यांना विद्यमान भाजप आमदार बंटी भांगडीया यांनी सलग 3 निवडणुकीत पराभूत केले होते. त्यामुळे चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांनी मतदारसंघासाठी हा मास्टरस्ट्रोक खेळल्याचे म्हटले जात आहे. आगामी जि. प. निवडणूक आणि राजकीय रचना बघता चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणातील ही मोठी घडामोड मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *