महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करणारे, कर्तव्यदक्ष आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व स्व. अजितदादा पवार यांचे बारामती येथे लैंडिंगदरम्यान झालेल्या दुर्देवी विमान अपघतात अकाली निधन झाले. ही घटना अत्यंत वेदनादायक व धक्कादायक आहे. माजी खासदार मा. नरेशबाबू पुगलिया यांनी शोकसंवेदना व्यक्त केले कि, महाराष्ट्राच्या राजकारणात व प्रशासनात ठाम निर्णयक्षमता दूरदृष्टी आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले आहे.
महाराष्ट्राचा रूबाब, एक उत्तम प्रशासक आणि अनेकांसाठी आधारवड हरपल्याची ही वेदना शब्दात व्यक्त करता येणार नाही. जनतेच्या प्रश्नांशी नाळ जुळवून विकासाभिमुख निर्णय घेणारे, कठीण प्रसंगी धाडसाने उभे राहणारे आणि राज्याच्या प्रगतीसाठी अखंड कार्यरत राहिलेले आजितदादा पवार यांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे. त्यांच्या कार्याची आठवण, विचारांची प्रेरणा आणि योगदान सदैव स्मारणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, आणि या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना, सहका-यांना व असंख्य समर्थकांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना..
नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेसच्या वतीने चंद्रपूर गांधी चौक येथे श्रध्दाजंली अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. यावेळी जिल्हा महासचिव श्री अशोक नागापूरे, शहराध्यक्ष श्री देवेंद्र बेले, माजी नगरसेवक श्रीनिवास पारनंदी व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
