#StudentSuccess Archives - https://infosher.in/tag/studentsuccess/ Fri, 25 Sep 2026 03:31:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.5 https://infosher.in/wp-content/uploads/2025/07/cropped-Clipboard06-32x32.jpg #StudentSuccess Archives - https://infosher.in/tag/studentsuccess/ 32 32 परीक्षेसोबतच विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी बनवा https://infosher.in/2026/09/25/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%a4%e0%a4%9a-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%8d/ https://infosher.in/2026/09/25/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%a4%e0%a4%9a-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%8d/#respond Fri, 25 Sep 2026 03:30:55 +0000 https://infosher.in/?p=3180 आमदार सुधाकर अडबाले यांचे पालक मेळाव्यात आवाहन चंद्रपूर : “आजचे युग हे तीव्र स्पर्धेचे आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेतील…

The post परीक्षेसोबतच विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी बनवा appeared first on .

]]>
आमदार सुधाकर अडबाले यांचे पालक मेळाव्यात आवाहन

चंद्रपूर : “आजचे युग हे तीव्र स्पर्धेचे आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांना केवळ परीक्षेतील गुण किंवा रँक मिळवण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करून यशस्वी होण्यासाठी सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना केवळ परीक्षेतच नाही, तर आयुष्यात यशस्वी बनवणे हेच खरे पालक-शिक्षकांचे ध्येय असावे.” असे प्रतिपादन आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बोर्डा (ता. जि. चंद्रपूर) येथे बुधवारी पार पडलेल्‍या पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून आमदार अडबाले बोलत होते.

यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. बोनगीरवार, मुख्याध्यापक आर. टी. खवशी, गावचे उपसरपंच दीपक खनके, संतोष मेश्राम, चेतन मेश्राम, सुनील देवगडे, विद्याताई आत्राम, आत्माराम तावाडे, प्रा. रवी झाडे, प्रकाश कुमरे, प्रतिभा पेंदोर व मोठ्या संख्येने पालक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्‍ताविक मुख्याध्यापक आर. टी. खवशी यांनी केले.

यावेळी सुरुवातीला शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते मॅथ (गणित) लॅब, सायन्स (विज्ञान) लॅब, डिजिटल क्लास रूम, सायन्स सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. तसेच विविध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

आमदार अडबाले पुढे म्‍हणाले, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आश्रमशाळेचा चेहरामोहरा बदलत आहे. त्‍याचवेळी विद्यार्थ्यांना घडविण्याचे उत्तम कार्य करणाऱ्या शिक्षकांना एखाद्या दुर्दैवी किंवा अपवादात्मक घटनेवरून जबाबदार धरले जाते. त्‍यामुळे शिक्षकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होते. ज्याचा अप्रत्यक्ष फटका विद्यार्थ्यांच्याच विकासाला बसतो. त्‍यामुळे विभागाने तात्‍काळ शिक्षक – कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करू नये. चौकशी करूनच पुढील कार्यवाही करावी. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी प्रवासासाठी शुभेच्छा देतो आणि अभ्यास व खेळाच्या माध्यमातून आपले, आपल्या पालकांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करा, अशी आशा व्यक्त करतो.

The post परीक्षेसोबतच विद्यार्थ्यांना आयुष्यात यशस्वी बनवा appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/09/25/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%a4%e0%a4%9a-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%8d/feed/ 0
युआयटीच्या पहिल्या बॅचने आपल्या कामगिरीतून संस्थेची नवी ओळख घडवावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा https://infosher.in/2026/09/10/%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%85%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a5%87/ https://infosher.in/2026/09/10/%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%85%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a5%87/#respond Thu, 10 Sep 2026 11:59:01 +0000 https://infosher.in/?p=3040 बी.टेक. विद्यार्थ्यांचा ‘दीक्षा आरंभ’ उत्साहात; तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्य व आत्मविश्वास विकसित करण्याचे आवाहन दोन महिन्यांच्या इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना मिळणार उद्योगांचा…

The post युआयटीच्या पहिल्या बॅचने आपल्या कामगिरीतून संस्थेची नवी ओळख घडवावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा appeared first on .

]]>
बी.टेक. विद्यार्थ्यांचा ‘दीक्षा आरंभ’ उत्साहात; तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्य व आत्मविश्वास विकसित करण्याचे आवाहन

दोन महिन्यांच्या इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना मिळणार उद्योगांचा प्रत्यक्ष अनुभव; विविध कंपन्या व उद्योगांमध्ये करिअरच्या व्यापक संधी

राज्यस्तरीय ॲथलेटिक्समध्ये चमकलेल्या मोनिका सानू मडावीचा गौरव; गडचिरोलीत सुसज्ज ॲथलेटिक ट्रॅक उभारणीला शासनाची मंजुरी

युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (युआयटी), गडचिरोलीच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी म्हणून तुमच्यावर विशेष जबाबदारी आहे. तुमची कामगिरी, यश आणि भविष्यातील उपलब्धी यातूनच या संस्थेची ओळख निर्माण होणार असून, पुढील बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी तुमची कामगिरी प्रेरणा आणि मापदंड ठरेल. त्यामुळे उपलब्ध शैक्षणिक संधींचा पुरेपूर उपयोग करून तांत्रिक ज्ञान, व्यावहारिक कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

गोंडवाना विद्यापीठ संचलित युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (युआयटी), गडचिरोली येथे शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘दीक्षा आरंभ’ (इन्डक्शन प्रोग्रॅम) कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, युआयटीचे प्रभारी मनिष उत्तरवार,
लॉयड्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय गुप्ता यांच्यासह युआयटीचे अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
बारावीनंतर शालेय शिक्षणातून व्यावसायिक शिक्षणाकडे होणारे संक्रमण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, हे अंतर प्रभावीपणे भरून काढण्यासाठी युआयटी विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. संस्थेत व्यावहारिक आणि तांत्रिक शिक्षणावर विशेष भर देण्यात येत असून चार व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.

दोन महिन्यांच्या इंटर्नशिपमधून उद्योगांचा अनुभव
युआयटीमधील चार वर्षांचा शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यावसायिक जडणघडणीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत दोन महिन्यांची इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार असून, याद्वारे उद्योगांमधील प्रत्यक्ष कामकाज, तांत्रिक प्रक्रिया आणि व्यावसायिक कार्यसंस्कृतीचा अनुभव घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी व्यापक आहेत. लॉयड्ससह अन्य कंपन्या आणि विविध उद्योगांमध्येही विद्यार्थ्यांना आपले करिअर घडविण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्याचे ध्येय न ठेवता उद्योगांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार आपली तांत्रिक व व्यावहारिक कौशल्ये विकसित करावीत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पहिल्या बॅचवर संस्थेच्या प्रतिष्ठेची जबाबदारी
युआयटीच्या पहिल्या बॅचला विशेष महत्त्व असल्याचे नमूद करताना जिल्हाधिकारी पंडा म्हणाले की, आजच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीवरून भविष्यात या संस्थेची ओळख निर्माण होणार आहे. पहिल्या बॅचने केलेली शैक्षणिक प्रगती, मिळविलेले रोजगार, विविध क्षेत्रांतील यश आणि उपलब्धी या पुढील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःच्या प्रगतीसोबत संस्थेच्या प्रतिष्ठेत भर घालण्याचे ध्येय ठेवावे.
गोंडवाना विद्यापीठ हे युआयटीचे पालक विद्यापीठ असून संस्थेला आवश्यक शैक्षणिक मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे. युआयटीचे संचालकही संस्थेच्या शैक्षणिक विकासासह विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सक्रियपणे प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

पाच वर्षांत युआयटीला प्रतिष्ठित संस्था बनविण्याचे ध्येय
येत्या पाच वर्षांत युआयटीने या भागातील विकसित आणि प्रतिष्ठित तंत्रशिक्षण संस्थांपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण करावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी पंडा यांनी व्यक्त केली. संस्थेच्या शैक्षणिक विकासासाठी जिल्हा प्रशासन सकारात्मक असून आवश्यक सहकार्य केले जाईल. विद्यार्थी, शिक्षक, विद्यापीठ, उद्योग आणि प्रशासन यांच्या समन्वयातून युआयटीच्या विकासाला अधिक गती मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी संस्थेत उपलब्ध असलेल्या सुविधा, प्राध्यापकांचे मार्गदर्शन, इंटर्नशिप आणि उद्योग क्षेत्राशी मिळणाऱ्या संपर्काचा जास्तीत जास्त उपयोग करावा. चार वर्षांच्या शिक्षणानंतर प्रत्येक विद्यार्थी तांत्रिकदृष्ट्या सक्षम, व्यावहारिक कौशल्यांनी परिपूर्ण आणि आत्मविश्वासाने करिअरच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास सज्ज असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मोनिका मडावीच्या क्रीडा कामगिरीचा गौरव
कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लॉयड्स स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या मोनिका सानू मडावी हिचा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मोनिकाने ४० व्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील २० वर्षांखालील वयोगटात पोल व्हॉल्ट प्रकारात सुवर्णपदक, तर उंच उडी प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे. पोल व्हॉल्टमध्ये सुवर्णपदक मिळविणारी ती गडचिरोली जिल्ह्यातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
मोनिकाच्या यशाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये मोठी क्षमता असल्याचे सांगितले. लॉयड्स फाउंडेशनच्या माध्यमातून खेळाडूंना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला.
गडचिरोली शहरात खेळाडूंसाठी सुसज्ज ॲथलेटिक ट्रॅक उभारण्यास राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून क्रीडा संकुल, कबड्डी व खो-खो मैदाने तसेच खेळाडूंसाठी वसतिगृहासह आवश्यक क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी पंडा यांनी सांगितले.
‘दीक्षा आरंभ’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नवप्रविष्ट विद्यार्थ्यांना युआयटीची शैक्षणिक व्यवस्था, अभ्यासक्रम, उपलब्ध सुविधा, व्यावहारिक प्रशिक्षण तसेच भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला युआयटीचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post युआयटीच्या पहिल्या बॅचने आपल्या कामगिरीतून संस्थेची नवी ओळख घडवावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/09/10/%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%86%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%ac%e0%a5%85%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a5%87/feed/ 0