#PowerSupply Archives - https://infosher.in/tag/powersupply/ Mon, 12 Oct 2026 02:49:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.5 https://infosher.in/wp-content/uploads/2025/07/cropped-Clipboard06-32x32.jpg #PowerSupply Archives - https://infosher.in/tag/powersupply/ 32 32 दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना २४ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा; आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://infosher.in/2026/10/12/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b6-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b6/ https://infosher.in/2026/10/12/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b6-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b6/#respond Mon, 12 Oct 2026 02:49:31 +0000 https://infosher.in/?p=3404 धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी महावितरणला तातडीने निर्देश देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा;…

The post दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना २४ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा; आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on .

]]>
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी महावितरणला तातडीने निर्देश देण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या हितासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पाठपुरावा; कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना आग्रह

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर बनली असून, पावसातील दीर्घ खंडामुळे शेतीपिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनावर अवलंबून राहावे लागत असताना, कृषिपंपांसाठी अखंडित वीजपुरवठा मिळणे अत्यंत आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरू नये आणि विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांना पिकांसाठी आवश्यक पाणी वेळेवर देता यावे, यासाठी कृषिपंपांना २४ तास अखंडित व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शेतकऱ्यांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी यापूर्वीही दोन पत्रांद्वारे शासनाचे लक्ष वेधले असून, दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

विशेषतः धान उत्पादक शेतकऱ्यांना पावसातील खंडामुळे पिके वाचविण्यासाठी सिंचनावर अवलंबून राहावे लागत आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवू शकते. त्यामुळे कृषिपंपांना २४ तास अखंडित व सुरळीत वीजपुरवठा मिळावा, अशी ठाम मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी यापूर्वीही दोन पत्रांद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे.

राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने, पावसातील दीर्घ खंडामुळे शेतीसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः धान उत्पादक भागांत पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी नियमित सिंचन अत्यावश्यक आहे. मात्र, कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, कमी दाबाने वीज मिळणे आणि तांत्रिक बिघाड वेळेत दूर न होणे यांमुळे शेतकऱ्यांना पिकांना आवश्यक पाणी देता येत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.शेतकरी आधीच बियाणे, खते, मजुरी आणि वाढत्या उत्पादन खर्चाचा भार सहन करीत आहेत. त्यात पावसाच्या अनिश्चिततेमुळे सिंचनाची गरज वाढली असताना वीजपुरवठाच अनियमित राहिला, तर पिकांचे नुकसान आणि आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पाणी उपलब्ध असूनही वीज नसल्यामुळे ते पिकांपर्यंत पोहोचवता येत नसेल, तर शेतकऱ्यांच्या कष्टांचे मोल धोक्यात येते. ही परिस्थिती केवळ वीज वितरणातील तांत्रिक समस्या म्हणून न पाहता, शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी आणि त्यांच्या कुटुंबांच्या भविष्याशी निगडित गंभीर प्रश्न म्हणून हाताळली पाहिजे, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी निवेदनाद्वारे मांडली आहे.

आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून सादर केलेल्या पत्रांवर संबंधित अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) यांना कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते. पण अजून पर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेता, या निर्देशांच्या अनुषंगाने कृषिपंपांच्या वीजपुरवठ्याचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. शासनस्तरावर घेतलेल्या निर्णयांचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या शेतापर्यंत सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित होणे महत्त्वाचे असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कृषिपंपांसाठी नियमित २४ तास वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासोबतच, ज्या गावांमध्ये वारंवार वीजखंडित होत आहे, तेथील विद्युत वाहिन्या आणि अन्य तांत्रिक यंत्रणांची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या दूर करून कृषिपंप योग्य क्षमतेने चालतील, याची दक्षता घेण्याची गरजही आ.मुनगंटीवार यांनी पत्रात अधोरेखित केली आहे. धान उत्पादक पट्ट्यातील शेतकऱ्यांची सिंचनाची गरज लक्षात घेऊन त्यांना प्राधान्याने अखंडित वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रभावी संपर्क यंत्रणा कार्यान्वित करावी, आवश्यक तांत्रिक कर्मचारी व दुरुस्ती पथके उपलब्ध करून द्यावीत आणि बिघाड दीर्घकाळ कायम राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सुचविले आहे.

वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही आ. मुनगंटीवार यांनी केली आहे. प्रभावित गावांमधील वीजपुरवठ्याचा विशेष आढावा घेऊन केलेल्या उपाययोजनांचा अहवाल निश्चित कालमर्यादेत सादर करावा. तसेच, कमी पावसामुळे बाधित भागांची पाहणी करून पिकांना आवश्यक सिंचन आणि पाणी उपलब्धतेबाबत संबंधित विभागांच्या समन्वयातून विशेष कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी आ.मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. पावसाच्या अनिश्चिततेशी झुंज देत, कर्जाचा आणि उत्पादन खर्चाचा भार पेलत शेतकरी मोठ्या आशेने पीक उभे करतो. अशा वेळी आवश्यक वीजपुरवठा न मिळाल्याने त्याचे पीक धोक्यात येणे, ही बाब संवेदनशीलतेने हाताळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांचे संरक्षण करणे आणि संकटाच्या काळात त्यांना आवश्यक आधार देणे ही शासन व प्रशासकीय यंत्रणेची महत्त्वाची जबाबदारी आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून महावितरण आणि संबंधित विभागांना स्पष्ट, कालबद्ध व परिणामकारक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत. कृषिपंपांसाठी सुरळीत वीजपुरवठा सुनिश्चित करून दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी ठाम मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

The post दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना २४ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा; आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/10/12/%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b6-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a4-%e0%a4%b6/feed/ 0
शहर विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक https://infosher.in/2026/06/12/%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%98/ https://infosher.in/2026/06/12/%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%98/#respond Fri, 12 Jun 2026 12:29:27 +0000 https://infosher.in/?p=2289 मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश चंद्रपूर : शहरातील विविध विकासकामे, मान्सूनपूर्व तयारी, सिव्हरेज प्रकल्प, अमृत योजना, वीजपुरवठा,…

The post शहर विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक appeared first on .

]]>
मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपूर : शहरातील विविध विकासकामे, मान्सूनपूर्व तयारी, सिव्हरेज प्रकल्प, अमृत योजना, वीजपुरवठा, नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सखोल चर्चा करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आढावा बैठक घेतली. यावेळी मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त नरेश अकुनुरी, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसीलदार विजय पवार, घुग्घूस नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकर, महावितरणचे कार्यकारी अभियंता दारव्हेकर, महानगरपालिकेचे उपायुक्त टाले, स्वच्छता निरीक्षक अमोल शेडकी, उपअभियंता आशिष भारती तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष तथा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मनपा गटनेते शेखर शेट्टी, महामंत्री रविंद्र गुरुनुले, नामदेव डाहुले, मनोज पाल, संजय तिवारी, विवेक बोढे, आशिष मासिरकर, प्रकाश देवतळे, बलराम डोडाणी, तुषार सोम, गणेश पिंपळकर, मधू तिवारी, निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, घुग्घूस नगर परिषद गटनेत्या मीना मोरपाका, नगरसेविका शीतल गुरुनुले, आशा देशमुख, अनुजा तायडे, ज्योती जीवने तसेच नगरसेवक भालचंद्र दानव, नगरसेवक रॉबिन बिश्वास, राकेश नाकाडे, प्रलय मशाखेत्री, सतीश तायडे, चंद्रशेखर देशमुख, धनराज जीवने, करण नायर आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरुवातीला शहरातील मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेचा आढावा घेण्यात आला. नाल्यांची साफसफाई, कचरा व्यवस्थापन, पाणी साचणाऱ्या भागांची ओळख तसेच पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. नागरिकांना पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
त्यानंतर शहरातील विविध विकासकामांच्या सद्यस्थितीची समीक्षा करण्यात आली. मंजूर कामांची प्रगती, निधीची उपलब्धता, तांत्रिक अडचणी आणि कामांच्या अंमलबजावणीतील अडथळे यावर सविस्तर चर्चा झाली. रखडलेली आणि अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
बैठकीत चंद्रपूर शहरातील आणि घुघुस येथील नजूल जागेवरील नागरिकांना स्थायी पट्टे देण्याच्या विषयावरही चर्चा करण्यात आली. विशेषतः १५०० चौ. फूटांपेक्षा अधिक जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून त्यांच्या प्रश्नांवर कायदेशीर व प्रशासकीय पातळीवर मार्ग काढण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच घुघुस नगर परिषद नव्या ईंमारती बाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
बैठकीत शहरातील भुयारी गटर (सिव्हरेज) योजनेचाही विशेष आढावा घेण्यात आला. सिव्हरेज प्रकल्पाच्या कामांची प्रगती, पाइपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीची स्थिती तसेच योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या नव्या रस्ते बांधकामांबाबत माहिती सादर करण्यात आली. कामे करताना नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेऊन दर्जेदार कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही प्रगती अहवाल तपासण्यात आला. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम आणि सुस्थितीत करण्यासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्याबाबत निर्देश देण्यात आले.
शहरातील वीजपुरवठ्याच्या स्थितीचा तसेच पावसाळ्यातील नियोजनाचा आढावा घेण्यात आला. संभाव्य वीज खंडित होण्याच्या घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
बैठकीत आगामी महाकाली महोत्सव २०२६ संदर्भातही सविस्तर चर्चा करण्यात आली. भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, सुरक्षा, पार्किंग व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधांच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. महोत्सवादरम्यान भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
शहरातील महापुरुष, राष्ट्रपुरुष आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या उभारणीच्या विषयावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. गोंडवाना साम्राज्याच्या शूर आणि पराक्रमी राणी हिराई, हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ तसेच आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या उभारणी संदर्भात प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला.
या अनुषंगाने पीडब्ल्यूडी विश्रामगृह परिसरात राजमाता जिजाऊ, बाल छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांसाठी योग्य जागा निश्चित करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच बंगाली कॅम्प परिसरात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून गंज वॉर्ड येथे राणी हिराई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठीही जागा निश्चित करण्यात आली आहे.
या सर्व स्मारकांच्या उभारणीमुळे शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीपर वारशाला अधिक बळकटी मिळणार असून भावी पिढीला प्रेरणा देणारी ही स्मारके ठरतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सदर प्रस्तावित स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

The post शहर विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आ. किशोर जोरगेवार यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/06/12/%e0%a4%b6%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%98/feed/ 0