#Babupeth Archives - https://infosher.in/tag/babupeth/ Thu, 11 Jun 2026 13:11:27 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.5 https://infosher.in/wp-content/uploads/2025/07/cropped-Clipboard06-32x32.jpg #Babupeth Archives - https://infosher.in/tag/babupeth/ 32 32 राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू अड्ड्यावर धाड, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील घटना , 11 ग्राहकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त https://infosher.in/2026/06/11/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a4%be/ https://infosher.in/2026/06/11/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a4%be/#respond Thu, 11 Jun 2026 13:11:27 +0000 https://infosher.in/?p=2283 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चंद्रपूर शहरातल्या बाबूपेठ परिसरात हॉटेल बजेट येथे सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून मोठी…

The post राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू अड्ड्यावर धाड, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील घटना , 11 ग्राहकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on .

]]>
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चंद्रपूर शहरातल्या बाबूपेठ परिसरात हॉटेल बजेट येथे सुरू असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या ठिकाणी परवानगीशिवाय मद्यविक्री करून ग्राहकांना मद्यपान व खाद्यपदार्थाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान एकूण 11 ग्राहक प्रत्यक्ष मद्यपान करताना आढळून आले. तसेच चुन्नू विजयपालसिंग परमार (मॅनेजर) हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले.

कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व 11 ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, संबंधित वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. दारू अड्ड्याचा मालक आशिष चांदेकर हा कारवाईदरम्यान फरार झाला असून त्याचा शोध घेण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याला अटक करण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून लवकरच त्याच्याविरुद्ध पुढील कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

The post राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारू अड्ड्यावर धाड, चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील घटना , 11 ग्राहकांसह व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/06/11/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%ad%e0%a4%be/feed/ 0
वातानुकूलित व्यवस्था व संगणक सुविधांनी सुसज्ज होणार बाबूपेठची अभ्यासिका – आ. किशोर जोरगेवार https://infosher.in/2026/05/21/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%b8-2/ https://infosher.in/2026/05/21/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%b8-2/#respond Thu, 21 May 2026 14:48:17 +0000 https://infosher.in/?p=2171 आ. किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी; मनपा अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि आधुनिक वातावरणात अभ्यास करता यावा,…

The post वातानुकूलित व्यवस्था व संगणक सुविधांनी सुसज्ज होणार बाबूपेठची अभ्यासिका – आ. किशोर जोरगेवार appeared first on .

]]>
आ. किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी; मनपा अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि आधुनिक वातावरणात अभ्यास करता यावा, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून बाबूपेठ येथील महादेव मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी तुषार सोम, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, अमोल नालमवार, सद्गुरू व्यासम प्रसारक मंडळाचे लोकेश बोरकर, प्रवीण ईटनकर, मनोज टिकले, राकेश पायपरे, पुंडलिक मेश्राम, गंगाधर बावणे, राजू येरणे, प्रवीण नागरकर, मोरेश्वर टिकले, सुनील रागीट, अशोक पेटकर, वेदांत अलमस्त यांच्यासह बाबूपेठ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबूपेठसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना शहरातील इतर भागात जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी या परिसरात सुसज्ज अभ्यासिका उभारण्याचा निर्णय घेतला होता. आता ही अभ्यासिका अंतिम टप्प्यात असून लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे.
यावेळी पाहणीदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर दिला. विशेषतः वातानुकूलित व्यवस्था, संगणक सुविधा, प्रशस्त बैठक व्यवस्था, प्रकाश व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांना शांत वातावरण मिळेल यासाठी आवश्यक अनुषंगिक कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगत आ. जोरगेवार यांनी शिक्षण क्षेत्रात दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शहरातील मोठ्या अभ्यासिकांप्रमाणे सुविधा आपल्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ही अभ्यासिका सुरू झाल्यानंतर बाबूपेठ व परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून अभ्यासासाठी दूरवर जाण्याची गरजही टळणार आहे. तसेच सदर इमारत दोन मजली असून तळमजल्यावर व्यायामशाळा असणार आहे. यात महिलांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

The post वातानुकूलित व्यवस्था व संगणक सुविधांनी सुसज्ज होणार बाबूपेठची अभ्यासिका – आ. किशोर जोरगेवार appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/05/21/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%b8-2/feed/ 0
वातानुकूलित व्यवस्था व संगणक सुविधांनी सुसज्ज होणार बाबूपेठची अभ्यासिका – आ. किशोर जोरगेवार https://infosher.in/2026/05/20/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%b8/ https://infosher.in/2026/05/20/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%b8/#respond Wed, 20 May 2026 01:59:52 +0000 https://infosher.in/?p=2149 आ. किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी; मनपा अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि आधुनिक वातावरणात अभ्यास करता यावा,…

The post वातानुकूलित व्यवस्था व संगणक सुविधांनी सुसज्ज होणार बाबूपेठची अभ्यासिका – आ. किशोर जोरगेवार appeared first on .

]]>
आ. किशोर जोरगेवार यांनी केली पाहणी; मनपा अधिकाऱ्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

विद्यार्थ्यांना शांत, सुसज्ज आणि आधुनिक वातावरणात अभ्यास करता यावा, या उद्देशाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून बाबूपेठ येथील महादेव मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक अभ्यासिकेची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांना विविध महत्त्वपूर्ण सूचना देत उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
यावेळी तुषार सोम, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, अमोल नालमवार, सद्गुरू व्यासम प्रसारक मंडळाचे लोकेश बोरकर, प्रवीण ईटनकर, मनोज टिकले, राकेश पायपरे, पुंडलिक मेश्राम, गंगाधर बावणे, राजू येरणे, प्रवीण नागरकर, मोरेश्वर टिकले, सुनील रागीट, अशोक पेटकर, वेदांत अलमस्त यांच्यासह बाबूपेठ येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबूपेठसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना शहरातील इतर भागात जावे लागत होते. ही अडचण लक्षात घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी या परिसरात सुसज्ज अभ्यासिका उभारण्याचा निर्णय घेतला होता. आता ही अभ्यासिका अंतिम टप्प्यात असून लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुली होणार आहे.
यावेळी पाहणीदरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर भर दिला. विशेषतः वातानुकूलित व्यवस्था, संगणक सुविधा, प्रशस्त बैठक व्यवस्था, प्रकाश व्यवस्था तसेच विद्यार्थ्यांना शांत वातावरण मिळेल यासाठी आवश्यक अनुषंगिक कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शालेय व महाविद्यालयीन शिक्षणासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे सांगत आ. जोरगेवार यांनी शिक्षण क्षेत्रात दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. ग्रामीण व सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शहरातील मोठ्या अभ्यासिकांप्रमाणे सुविधा आपल्या परिसरातच उपलब्ध व्हाव्यात, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ही अभ्यासिका सुरू झाल्यानंतर बाबूपेठ व परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून अभ्यासासाठी दूरवर जाण्याची गरजही टळणार आहे. तसेच सदर इमारत दोन मजली असून तळमजल्यावर व्यायामशाळा असणार आहे. यात महिलांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

The post वातानुकूलित व्यवस्था व संगणक सुविधांनी सुसज्ज होणार बाबूपेठची अभ्यासिका – आ. किशोर जोरगेवार appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/05/20/%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%b8/feed/ 0
सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा – आ. किशोर जोरगेवार https://infosher.in/2026/05/17/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d/ https://infosher.in/2026/05/17/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d/#respond Sun, 17 May 2026 10:39:24 +0000 https://infosher.in/?p=2129 बाबूपेठ येथे सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न; विविध आजारांवर निशुल्क उपचार सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच…

The post सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा – आ. किशोर जोरगेवार appeared first on .

]]>
बाबूपेठ येथे सर्वरोग निदान व उपचार शिबिर संपन्न; विविध आजारांवर निशुल्क उपचार

सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये आणि गंभीर आजारांचे वेळेत निदान व्हावे, या उद्देशाने आयोजित भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिरात ते बोलत होते.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे), सामान्य रुग्णालय चंद्रपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी बाबूपेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर बायपास रोडवरील के.जी.एन. कॉन्व्हेंट येथे भव्य “सर्वरोग निदान व उपचार शिबिर” आयोजित करण्यात आले होते. यावेळी आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विभागप्रमुख डॉ. शशांक बोथरकर, भारतीय जनता पार्टीचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष रघुवीर अहिर, महामंत्री श्याम कनकम, सविता दंढारे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर, तुषार सोम, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, सायली तोंडरे, गणेश गेडाम, दिवाकर पुडट्टवार, निलिमा वनकर, के.जी.एन. कॉन्व्हेंटचे संस्थापक महेमुद शेख, विमल कातकर आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज आयोजित करण्यात आलेले हे “भव्य सर्वरोग निदान व उपचार शिबिर” हे केवळ एक आरोग्य शिबिर नसून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाला चांगल्या आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजेत. आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही उपचारांपासून वंचित राहू नये, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
आज सर्वसामान्य कुटुंबांना मोठमोठ्या आजारांच्या उपचारासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक वेळा तपासण्या, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया यांचा खर्च परवडत नसल्यामुळे रुग्ण उपचार घेण्यास उशीर करतात. यामुळे आजार अधिक गंभीर होतात. हीच बाब लक्षात घेऊन विविध तज्ज्ञ डॉक्टरांना एकत्र आणत हे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये मेडिसिन, नेत्ररोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा तसेच शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर नागरिकांची तपासणी करणार आहेत. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, मोतीबिंदू, हर्निया, महिलांचे आजार, सांधेदुखी, त्वचारोग यांसारख्या अनेक आजारांवर मोफत तपासणी व उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे गरज असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहेत. गरीब व गरजू नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळावा, हा यामागचा मुख्य हेतू आहे. एक्स-रे, रक्त तपासणी, लघवी चाचणी, सोनोग्राफी तसेच आवश्यकतेनुसार सीटी स्कॅन व एमआरआय तपासण्यादेखील मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ही सेवा सामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात अनेक बालकांच्या हृदयात छिद्र असल्याचे निदान झाले. त्यापैकी काही बालकांना मुंबई येथे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले आहे. त्या चिमुकल्यांमध्ये अवघ्या पाच व सहा महिन्यांच्या बालकांचाही समावेश आहे. त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता उत्तम आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी हजारो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

The post सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी मोफत सेवा उपलब्ध करून देणे हीच खरी लोकसेवा – आ. किशोर जोरगेवार appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/05/17/%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%8d/feed/ 0
धम्मभूमी, बाबूपेठ येथे ७ एकरवर उभारणार पॅगोडा धर्तीचे विपश्यना केंद्र . https://infosher.in/2026/04/17/%e0%a4%a7%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%a0-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a5%ad-%e0%a4%8f/ https://infosher.in/2026/04/17/%e0%a4%a7%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%a0-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a5%ad-%e0%a4%8f/#respond Fri, 17 Apr 2026 15:34:42 +0000 https://infosher.in/?p=1865 आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह केली स्थळाची प्रत्यक्ष पाहणी; प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुंबई येथील पॅगोडा विपश्यना केंद्राच्या धर्तीवर…

The post धम्मभूमी, बाबूपेठ येथे ७ एकरवर उभारणार पॅगोडा धर्तीचे विपश्यना केंद्र . appeared first on .

]]>
आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह केली स्थळाची प्रत्यक्ष पाहणी; प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश

मुंबई येथील पॅगोडा विपश्यना केंद्राच्या धर्तीवर चंद्रपूर शहरातील धम्मभूमी, आंबेडकर नगर, बाबूपेठ येथे ७ एकर जागेवर भव्य विपश्यना ध्यान केंद्र उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने आज त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत स्थळाची प्रत्यक्ष पाहणी करत प्रकल्पाचा प्रस्ताव तात्काळ शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
यावेळी तहसीलदार विजय पवार, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुले, मनपा शहर अभियंता रविंद्र हजारे, उपअभियंता भसारकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता राठोड, महावितरणचे कार्यकारी अभियंता दार्वेकर, मनपा अभियंता पवार, धम्मभूमी महाविहारचे संचालक महाथेरो डॉ. सुमनवन्नो, सायली येरणे, निलिमा वनकर आदींची उपस्थिती होती.
स्थळ पाहणीदरम्यान आ. जोरगेवार यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून प्रकल्पाच्या आराखड्याबाबत सविस्तर चर्चा केली. यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने सविस्तर व तांत्रिकदृष्ट्या सक्षम प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले. प्रस्ताव सादर करताना कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यावेळी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. प्रवेशमार्ग सुकर करणे, पाणी व वीजपुरवठ्याची योग्य व्यवस्था करणे, पर्यावरणीय संतुलन राखणे तसेच संपूर्ण प्रकल्पाचा आराखडा पॅगोडा धर्तीवर आकर्षक आणि दर्जेदार पद्धतीने तयार करणे, यावर विशेष भर देण्यात आला.
आ. जोरगेवार म्हणाले की, हे विपश्यना केंद्र केवळ धार्मिक स्थळ नसून मानसिक शांतता, ध्यानधारणा आणि अध्यात्मिक साधनेसाठी एक महत्त्वाचे केंद्र ठरेल. या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही चालना मिळेल. तसेच, प्रस्ताव शासनाकडे पाठविताना सर्व आवश्यक कागदपत्रे, नकाशे आणि तांत्रिक बाबी पूर्ण करून सादर कराव्यात, जेणेकरून मंजुरी प्रक्रियेत कोणताही विलंब होणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

The post धम्मभूमी, बाबूपेठ येथे ७ एकरवर उभारणार पॅगोडा धर्तीचे विपश्यना केंद्र . appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/04/17/%e0%a4%a7%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%a0-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a5%ad-%e0%a4%8f/feed/ 0