#AshramSchool Archives - https://infosher.in/tag/ashramschool/ Mon, 05 Oct 2026 02:55:00 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=7.1.5 https://infosher.in/wp-content/uploads/2025/07/cropped-Clipboard06-32x32.jpg #AshramSchool Archives - https://infosher.in/tag/ashramschool/ 32 32 विजाभज आश्रम शाळा शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात बैठक https://infosher.in/2026/10/05/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%9c-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95/ https://infosher.in/2026/10/05/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%9c-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95/#respond Mon, 05 Oct 2026 02:55:00 +0000 https://infosher.in/?p=3311 मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजनांचे निर्देश चंद्रपूर : इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री…

The post विजाभज आश्रम शाळा शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात बैठक appeared first on .

]]>
मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजनांचे निर्देश

चंद्रपूर : इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री ना. अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखाली आश्रम शाळा कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालय मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडली. या बैठकीत आश्रम शाळा कर्मचारी व शिक्षकांच्या विविध समस्या आणि प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी विविध प्रश्नांवर मंत्री अतुल सावे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना समस्या सोडविण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आश्रम शाळा कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

बैठकीत आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा, ऑलिम्पियाड, शिष्यवृत्ती परीक्षा यांसह विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना मंत्री महोदयांनी केल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस आमदार सुधाकर अडबाले, सचिव आप्पासाहेब धुळाज, संचालक सोनाली मुळे, सर्व प्रादेशिक उपसंचालक तसेच विभागातील प्रमुख अधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य आश्रम शाळा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष बालाजी मुंडे, सरचिटणीस किशन पुंड, तुकाराम शिरसाठ सर, केंद्रे सर, मुनेश्वर सर, रुपेश पाटील सर, सानप सर यांच्यासह संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर आमदार सुधाकर अडबाले यांच्या कार्याचा आढावा घेणारे “सुधाकरपर्व” पुस्‍तक आमदार अडबाले यांनी मंत्री अतुलजी सावे यांना भेट दिले.

The post विजाभज आश्रम शाळा शिक्षक – कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर मंत्रालयात बैठक appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/10/05/%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ad%e0%a4%9c-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%95/feed/ 0
परिसरातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करा; जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश https://infosher.in/2026/08/17/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a8/ https://infosher.in/2026/08/17/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a8/#respond Mon, 17 Aug 2026 10:00:06 +0000 https://infosher.in/?p=2867 चंद्रपूर दि. 17 : गडचिरोली येथील आश्रमशाळेत घडलेल्या प्रकरणाची राज्य शासनाने गांभिर्याने दखल घेऊन सर्व जिल्ह्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश…

The post परिसरातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करा; जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश appeared first on .

]]>
चंद्रपूर दि. 17 : गडचिरोली येथील आश्रमशाळेत घडलेल्या प्रकरणाची राज्य शासनाने गांभिर्याने दखल घेऊन सर्व जिल्ह्यांना आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आज (दि. 17) यंत्रणांचा आढावा घेऊन आपापल्या परिसरातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले.

पुढे त्या म्हणाल्या, ज्या गावात, तालुक्यात आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, व्हीजेएनटीच्या शासकीय आश्रमशाळा किंवा अनुदानित आश्रमशाळा आहेत, तेथे मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील आदींनी नियमित भेट देऊन अधिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संपर्कात राहावे. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ उपचार मिळण्यासाठी परिसरातील आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर स्टाफचे मोबाईल क्रमांक आश्रमशाळेतील कर्मचा-यांजवळ असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित महसूल यंत्रणेच्या अधिकारी – कर्मचा-यांचेही मोबाईल क्रमांक आश्रमशाळेत देऊन ठेवावे.

आश्रमशाळेच्या परिसरातील वाढलेले गवत, झुडपे नियमितपणे काढावे. जेणेकरून साप, विंचू आदींपासून कोणताही धोका राहणार नाही. झाडे, झुडपे असलेल्या भागात तसेच संरक्षण भिंतीलगत थिमेटचा वापर करावा. त्याची दिनांकनिहाय नोंद ठेवावी. वर्गखोल्या आणि विद्यार्थी असेलेल्या खोल्यांच्या दरवाजाखाली रबर स्टिक लावून घ्यावी. परिसरात सीसीटीव्ही लावण्याचे नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.
यावेळी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार तर दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व तहसीलदार उपस्थित होते.

The post परिसरातील आश्रमशाळांची नियमित तपासणी करा; जिल्हाधिका-यांचे यंत्रणांना निर्देश appeared first on .

]]>
https://infosher.in/2026/08/17/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%a8/feed/ 0